महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ सकाळपासून नॉटरिचेबल आहेत. दोन दिवसांपूर्वी मंत्रालयातील त्यांच्या कार्यलयात एसीबीने छापा मारला होता. या छाप्यामध्ये संबंध आढळल्यास राजीनामा देईन असे ते म्हणाले होते. आता झिरवळांच्या खासगी पीएने पैसे घेण्यास सांगितल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यानंतर मंत्री नॉट रिचेबल आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आलेय.
मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यलयात काम करणाऱ्या राजेंद्र ढेरंग यांनी एका औषध दुकानदाराचा निलंबित परवाना पुन्हा देण्यासाठी लाच मागितली होती आणि हे पैसे स्वीकारताना ते एसीबीच्या जाळ्यात सापडले. यावरून या खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र अन्न आणि औषध प्रशासन मंत्री झिरवळ यांनी या प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचे सांगितले.
परंतु, आता लाच प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून तपासामध्ये अटक केलेल्या लिपीकाने मंत्री झिरवळांच्या खाजगी पीएने पैसे घेण्यास सांगितल्याचे कबुली दिल्याची माहिती आहे. त्यामुळे झिरवळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचदरम्यान आज सकाळपासून ‘नॉट रिचेबल’ आहेत. मंत्री नरहरी झिरवळ यांनी या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही. जर आपला संबंध यामध्ये असल्याचे सिद्ध झाले तर आपण राजीनामा देऊ. दरम्यान, या प्रकरणात आता झिरवळाच्या खासगी सचिवाचे नाव पुढे आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.















Discussion about this post