जळगाव : जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवले असून महापौर आणि उपमहापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याची उत्सुकता होती. अखेर भाजपाच्या दीपमाला मनोज काळे यांची महापौरपदी तर शिंदेसेनेचे मनोज सुरेश चौधरी यांची उपमहापौरपदी निवड निश्चित मानली जात आहे.
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत महायुती चे 69 उमेदवार निवडून आले होते. यामध्ये भाजपने ४६ पैकी ४६ जागांवर आणि शिवसेनेने २३ पैकी २२ जागांवर विजय मिळविला होता.
निवडणुकीनंतर महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. महापौरपद हे ‘ओबीसी महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे या पदावर कुणाची वर्णी लागते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
उज्ज्वला बेंडाळे व दीपमाला काळे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या वतीने दीपमाला काळे यांच्या नावावर पसंतीची मोहोर उमटवली. दुसरीकडे, ठरलेल्या सूत्रानुसार उपमहापौरपद शिवसेनेकडे गेले असून, प्रभाग-८ मधून बिनविरोध निवडून आलेले मनोज सुरेश चौधरी यांना या पदासाठी संधी देण्यात आली आहे.














Discussion about this post