जळगाव । गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात वाढ झाल्याने दोन्ही धातूंनी नको तो विक्रम केला. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागणार आहे. जळगाव सुवर्ण बाजारात ऐतिहासिक उच्चांकाशी झेप घेतल्यानंतर आता सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
जळगाव सुवर्ण बाजारात गुरुवारी (ता. २९) सोने आणि चांदीने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. मात्र त्यानंतर लगेचच दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे.गुरुवारी चांदीचा दर ‘जीएसटी’सह प्रतिकिलो 4 लाख रुपयांच्या पुढे गेला होता, तर सोने प्रतिदहा ग्रॅम 1 लाख ८३ हजार रुपयांवर पोहोचले होते. हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर मानला जात होता. मात्र शुक्रवारी (ता. ३०) चांदीच्या दरात प्रतिकिलो तब्बल ४२ हजारांची, तर सोन्याच्या दरात प्रतिदहा ग्रॅम ९ हजारांची घट झाली.
शनिवारी (ता. ३१) बाजारात सोन्याचा दर ‘जीएसटी’सह 1 लाख ६३ हजारांपर्यंत खाली आला असून चांदीचा दर 3 लाख तीन हजार रुपयांवर स्थिरावला आहे. अवघ्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात सुमारे ११ हजारांची, तर चांदीच्या दरात जवळपास ५० हजारांची घसरण झाली आहे.
सोने: ₹१,५९,००० | चांदी: ₹३,०३,०००















Discussion about this post