जर तुम्ही दहावी उत्तीर्ण झाला असाल आणि सरकारी नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडिया पोस्टने २०२६ च्या ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेमुळे देशभरातील हजारो तरुणांना पोस्ट ऑफिसमध्ये काम करण्याची संधी मिळेल.
पोस्ट ऑफिसने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदासाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत २३ डाक सर्किलमध्ये भरती होणार आहे. एकूण २८,७४० पदांसाठी ही भरती होणार आहे. ही वर्षभरातील सर्वात मोठी भरती असणार आहे.
कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी
डाक विभागातील ही भरती कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. या नोकरीसाठी तुमची निवड १०वीत मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती indiapostgdsonline.gov.in या वेबसाइटवर प्रकाशित केली जाणार आहे. ३१ जानेवारी २०२६ पासून या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु होईल.
या भरती मोहिमेत ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्टमास्ट, सहाय्यक शाखा पोस्टमास्टर अशा पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी फक्त १०वी पास असायला हवे. १८ ते ४० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
पगार
डाक विभागातील या नोकरीसाठी पगार पदानुसार वेगवेगळा असणार आहे. जीडीएस पदासाठी १०,००० ते २४,४७० रुपये पगार मिळणार आहे. शाखा पोस्ट मास्टर पदासाठी १२,००० ते २९,३८० रुपये पगार मिळणार आहे. हा पगार सरकारी नियमानुसार वाढवला जाईल.















Discussion about this post