राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा पुढे कोण नेणार असा प्रश्न पडला होता. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते. अखेर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी विराजमान होणार आहेत. तर त्यांच्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी कार्यक्रम होणार आहे. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता ठरणार आहे. या बैठकीसाठी प्रदेक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधिमंडळात पक्षाचं अधिकृत पत्रही दिलं आहे. राज्यातील सर्व आमदारांना बैठकीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आले आहे.
सध्या सुनेत्रा पवार या केंद्रात राज्यसभेच्या खासदार आहेत. सुनेत्रा पवार या राज्याच्या राजकारणात सक्रीय होतील, त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार आहेत. पण मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्यानंतर केंद्रात पार्थ पवार हे खासदार होतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यांची ही जागा रिक्त होणार आहे, या जागेवर पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.















Discussion about this post