मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याने महाराष्ट्रासह देशात खळबळ उडाली. या घटनेनंतर राज्य सरकारने सरकारी विमानं आणि हेलिकॉप्टर्ससंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सरकारी हवाई वाहनांच्या तातडीच्या महत्त्वाच्या कामांसाठी ६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. डिसेंबर २०२५ च्या पुरवणी मागण्यांद्वारे सरकारी हवाई वाहनांसंदर्भात मागणी करण्यात आली होती. यानंतर आता वित्त विभागाच्या व्यय अग्रक्रम समितीने खर्चास मंजुरी दिली आहे.
प्रत्येकी ३ कोटींच्या दोन पुरवणी मागण्यांद्वारे ६ कोटींची मागणी केली होती. यावर लहान बांधकामे व यंत्रसामुग्री व साधनसामुग्री उद्दीष्टासाठी वित्त विभागाची संमती दिली आहे.















Discussion about this post