सरकारी बँकेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी गुडन्यूज आहे. स्टेट बँकेने २ हजारपेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.
देशभरात १६ ठिकाणी सर्किल बेस्ड ऑफिसर पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया काल म्हणजेच २९ जानेवारीपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ibpsreg.ibps.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
स्टेट बँकेची भरती महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, ओडिशा, जम्मू काश्मीर, तामिळनाडू, गुजरात, आसाम, तेलंगणा, राजस्थान, गोवा, उत्तर प्रदेश, राजस्थान, केरळ या ठिकाणी होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.
स्टेट बँकेतील या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत मेडिकल,इंजिनियरिंग, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट यामध्ये पदवीप्राप्त उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. २१ ते ३० वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
२२७३ पदांसाठी भरती
स्टेट बँकेत एकूण २२७३ पदांसाठी भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०२६ आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४८४८० ते ८५९२० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी बेसिक सॅलरी ४८,४८० रुपये असणार आहे.
भरती प्रक्रिया
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, स्क्रिनिंग, इंटरव्ह्यू आणि स्थानिक भाषा टेस्टद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरायचे आहे. तुम्हाला sbi.bank.in वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. ही भरती आयबीपीएसद्वारे केली जाणार आहे.















Discussion about this post