मुंबई । राज्यातील महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाबाबतची प्रतीक्षा अखेर संपली आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत येत्या २२ जानेवारीला निघणार आहे. मंत्रालयातील परिषद सभागृहात सकाळी ११ वाजता ही प्रक्रिया पार पडेल.
नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत प्रक्रिया पार पडणार आहे. या सोडतीवर राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य अवलंबून असल्यामुळे अनेकांचे लक्ष याकडे लागले आहे.
दरम्यान महापौरपदासाठी सोडतीतून आरक्षण निश्चित केले जाते. सर्वसाधारण पुरूष किंवा महिला, ओबीसी, अनुसूचित जाती आणि जमाती अशा क्रमाने आरक्षण सोडत काढली जाते. आधी जर सर्वसाधारण गटासाठी महापौरपद असल्यास पुढच्या वेळी म्हणजे आता तो गट वगळून अन्य प्रवर्गाला आरक्षण दिले जाते. जेणेकरून सर्व गटांना सर्वोच्चपद भूषविण्याची संधी मिळेल. यावेळी जळगावचे महापौरपद कोणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post