मुंबई । राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत 20 पेक्षा अधिक पालिकांवर भाजपचा ध्वज फडकताना दिसेल, त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. मात्र याच दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांना मोठा धक्का बसला आहे.
मुख्यमत्र्यांसाठी आजच्या निवडणुकीत एक धक्कादायक निकालही लागला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती यांना पराभवाचा धक्का बसला आहे. अमरावती महानगरपालिकेची सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या लढतीत मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ विवेक कलौती पराभूत झाले.
तसेच आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू विवेक भारतीय यांचाही पराभव झाल्याने फडणवीस यांना दुहेरी धक्का बसला. विशेष म्हणजे या प्रभागातील काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झाले. दणदणीत मतांनी त्यांचा विजय झालाय .















Discussion about this post