जळगाव महापालिकेच्या ६३ जागांसाठी महापालिकांचा निवडणुका झाल्या असून आज सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. नक्की कोणाच्या हातात महापालिकेची सत्ता येणार हे दुपारी २ वाजेपर्यंत समोर येणार आहे.
सुरुवातीच्या कलानुसार अनेक प्रभागांमध्ये भाजप सेनेचे उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहेत. प्रभाग क्रमांक 14 मध्ये सुनील महाजन आणि माजी महापौर जयश्री महाजन या आघाडीवर असून प्रभाग क्रमांक 13 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल देवकर सातशे मतांनी आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.माजी महापौर ललित कोल्हे आघाडीवर आहेत. तर माजी महापौर ललित कोल्हे यांनी देखील जवळपास १००० पेक्षा मतांनी आघाडी घेतली आहे
प्रभाग क्रमांक १९ मध्ये महायुतीला विजयी आघाडी (निकिता वंजारी-शिवसेना, राजेंद्र घुगे पाटील-भाजप), प्रभाग क्रमांक १८ मधील शिवसेनेचे उमेदवार अनिता भापसे आणि नलूबाई सोनवणे आघाडीवर, प्रभाग क्रमांक ४ मधील महायुतीचे उमेदवार पियुष ललीत कोल्हे हे ८०० मतांनी आघाडीवर, प्रभाग क्रमांक ५ माजी महापौर विष्णू भंगाळे हे आघाडीवर….
प्रभाग क्रमांक १८ ब मधून नलुबाई तुळशीदास सोनवणे आणि “क” मधून अनिता सुरेश भापसे हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार विजयी















Discussion about this post