जळगाव । गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तेजीत असलेल्या सोने आणि चांदीच्या दराने आज बुधवारी आणखी नवीन ऐतिहासिक उच्चांक केला. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
सोन्याच्या दरात 1500 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 16 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 46 हजार 260 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 90 हजार 460 रुपयांवर पोहोचले आहेत.
सोन्याचे दर दीड लाखांच्या उंबरठ्यावर तर चांदीचे दर 3 लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. जळगावात सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दर नव्या विक्रमी उच्चांकावर पोहोचलं आहे.















Discussion about this post