विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील शाळांना पुढचे ५ दिवस सुट्ट्या असणार आहेत. मकरसंक्रांत आणि महानगरपालिका निवडणुकांमुळे सलग 5 दिवस सुट्टी मिळणार आहे. याचसोबत मतदान केंद्र असलेल्या शाळा आणि कार्यालयांना सुट्टी दिली आहे.
शाळांना सलग ५ दिवस सुट्ट्या
राज्यातील शाळांना उद्या म्हणजेच १४ जानेवारीपासून सुट्ट्या असणार आहे. शाळा आता थेट पुढच्या सोमवारी सुरु होणार आहे. १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांत आहे. यानंतर १५ आणि १६ जानेवारीला महापालिका निवडणुका आहेत. १५ जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी आहे. यानिमित्त शाळांना सुट्ट्या असणार आहे. अनेक शाळांमध्ये मतदान केंद्र आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
१५ आणि १६ जानेवारीला महापालिका निवडणुका झाल्यानंतर शनिवारी अनेक शाळांना सुट्टी असते. यानंतर रविवारी शाळांना सार्वजनिक सुट्टी असणार आहे. त्यामुळे उद्यापासून शाळांना ५ दिवस सलग सुट्टी असणार आहे.
अनेक सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना निवडणुकीसाठी ड्युटी लागली आहे. त्यामुळे महापालिका भागातील अनेक शिक्षक इलेक्शन ड्युटीवर आहेत. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.















Discussion about this post