जळगाव । मागच्या काही दिवसापूर्वी सोने आणि चांदीचे दर वाढताना दिसत असून आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याने पुन्हा नवा उच्चांक केला.सोन्याचे दर अचानक नव्या उंचीवर पोहोचल्याने ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली.
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज सोमवारी सकाळच्या सत्रात सोने दरात १४४२ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख ४४ हजार ६१२ रूपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. यापूर्वी २७ डिसेंबरला २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख ४४ हजार ४०६ रूपयांच्या उच्चांकापर्यंत पोहोचले होते. मधल्या काळात सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार झाले. मात्र, एकदाही सोन्याने नवीन उच्चांक केला नाही.
सोने आणि चांदीच्या किमतींनी २०२६ च्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांना मोठा धक्का देत नवा इतिहास रचला आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात जोरदार तेजी पाहायला मिळाली. जागतिक आर्थिक अनिश्चितता, भू-राजकीय तणाव आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल, यामुळे दोन्ही धातूंनी सार्वकालिक उच्चांक गाठले.















Discussion about this post