मुंबई । अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नुकतेच निवडून आलेले 12 काँग्रेस नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत हा पक्षबदल काँग्रेससाठी मोठा राजकीय खिंडार ठरला आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये विजयी झाल्यानंतर काँग्रेसच्या या सर्व १२ नगरसेवकांनी भाजपसोबत युती केली होती. त्यानंतर पक्षाकडून त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आणि या 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या नगरसेवकांनी भाजपमध्ये जाणं हा काँग्रेससाठी धक्का मानलं जात आहे.
दर्शना पाटील, अर्चना पाटील, हर्षदा पाटील, तेजस्विनी पाटील, प्रदीप पाटील, विपुल पाटील, कबीर गायकवाड, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजिवनी देवडे, दिनेश गायकवाड आणि किरण राठोड या १२ नगरसेवकांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप नेते तसेच मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. संजीव नाईक आणि दीपक म्हात्रे आदींचीही यावेळी उपस्थिती राहणार आहे.
अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नुकतेच निवडून आलेले 12 काँग्रेस नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत हा पक्षबदल काँग्रेससाठी मोठा राजकीय खिंडार ठरला आहे. यामुळे ‘विश्वास ठेवायचा तरी कुणावर?’ असा प्रश्न उपस्थित झाला आहे.















Discussion about this post