जळगाव । जळगाव शहर महानगर पालिका निवडणुकीसाठी प्रचाराला वेग आला असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रचाराच्या मैदानात उतरून महाविकास आघाडीच्या (मविआ) प्रचाराचा औपचारिक शुभारंभ केला. या घडामोडीमुळे जळगावच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.
एकनाथ खडसे यांनी मविआच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित प्रचार सभेत सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. “जनतेचे प्रश्न प्रलंबित असून केवळ शक्तीप्रदर्शनावर भर दिला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. आगामी निवडणुकीत बदल घडवण्यासाठी मविआ एकत्रितपणे लढत असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या सभेला मविआतील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचा दौरा आणि त्याच दिवशी खडसेंची सक्रिय एंट्री यामुळे जळगावमधील निवडणूक रणधुमाळी आणखी रंगतदार झाली असून पुढील काही दिवसांत प्रचाराची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post