जळगाव । एकीकडे जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापू लागले असून याच दरम्यान महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना आता आपल्या खर्चावर बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे. आता ६ जानेवारीपासून प्रत्येक उमेदवाराला आपल्या निवडणूक खर्चाचा दैनंदिन हिशोब महापालिका प्रशासनाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
आयोगाने एका उमेदवारासाठी ९ लाख रुपयांची खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. जर एखाद्या उमेदवाराचा खर्च या मयदिपेक्षा जास्त झाला, तर त्याला पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले जाऊ शकते.
प्रचार साहित्य : फ्लेक्स, पोस्टर्स, कट-आउट्स, पत्रके, झेंडे, टोप्या आणि बिल्ले.
सभा आणि रॅली : स्टेज, मंडप, खुच्र्यांचे भाडे, लाउडस्पीकर आणि डीजे सिस्टिम, खानपान, कार्यकर्ते आणि लोकांसाठी चहा, नाश्ता, पाणी आणि जेवण. वाहन खर्च गाड्यांचे भाडे, इंधन (पेट्रोल/डिझेल) आणि चालकांचा भत्ता.
जाहिरात : वृत्तपत्रे, केबल टीव्ही आणि सोशल मीडिया वरील सशुल्क प्रचार. कार्यालयीन खर्च : मध्यवर्ती कार्यालयाचे भाडे आणि वीज बिल याचा हिशेब उमेदवारांना द्यावा लागेल.
२० कर्मचारी नियुक्त उमेदवारांनी सादर केलेल्या रोजच्या
खर्चाची तपासणी करण्यासाठी २० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आयोगाने निर्धारित केलेल्या नऊ लाखापेक्षा अधिक खर्च झाल्याचे सिद्ध झाल्यास तसा अहवाल पाठवण्यात येईल व उमेदवाराला अपात्र करत त्याला सहा वर्षासाठी बंदी करण्याची प्रक्रीया विभागीय आयुक्तांकडून केली जाईल.
विजयकुमार सोनवणे, मुख्य लेखा परीक्षक, मनपा















Discussion about this post