जळगाव । भडगाव तालुक्यातील एका गावात सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेच्या निषेर्धात भडगावात मूक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच या घटनेचे पडसाद विधानसभेत पाहायला मिळाले. पाचोरा भडगाव आमदार किशोर पाटील यांनी अधिवेशानात संशयिताला कठोर शिक्षा व्हावी असा प्रश्न मांडला.
तर दुसरीकडे आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पिडीत मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क साधला, आणि चांगल्यातला चांगला वकील लावला जाईल, संशयित आरोपीला कठोर शिक्षा होईल असे आश्वासन दिले.
भडगाव तालुक्यातील गोडगाव येथे सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यात लपवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर आरोपीला अटक केली आहे. या घटनेच्या निषेर्धात आज भडगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने महिला पुरुष तसेच तरुण हे सहभागी झाल्याचे पाहायाला मिळाले.
दरम्यान, जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत याठिकाणाहून जाणार नाही, असा पावित्रा मोर्चात सहभागी पिडीतेच्या कुटुंबियांनी तसेच ग्रामस्थांनी घेतला. त्यावर या मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमीत पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून पिडीतेच्या कुटुंबियांचे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलंण करुन दिलं.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आरोपीला अटक झाली आहे, तो सुटणार नाही, यासाठी व्यवस्था आपण केली असून विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्यासारखा चांगला वकील देऊ. संबंधितावर कठोर कारवाई होईल..एकदम कडक कारवाई होईल, असं आश्वासन दिलं.















Discussion about this post