जळगाव । सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सर्वकालीन उच्चांकावर पोहोचलेल्या सोन्यात तीन दिवसांत मोठी पडझड झाल्याने ग्राहकांनाही दिलासा मिळाला. मागच्या तीनच दिवसांत सोने दरात तब्बल ६६९५ रूपयांची घसरण झाली.
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेतही सोमवारी २५७५ रूपयांची घट नोंदवली गेल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ४१ हजार ८३१ रूपयांपर्यंत खाली आले होते. मंगळवारी पुन्हा २५७५ रूपयांची घट नोंदवली गेल्यानंतर सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३९ हजार २५६ रूपयांपर्यंत घसरले होते.
दरम्यान आज ३१ डिसेंबर रोजी सकाळी बाजार उघडल्यावर आणखी १५४५ रूपयांची घट झाली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३७ हजार ७११ रूपयांपर्यंत घसरले. सोमवार आणि मंगळवार या दोनच दिवसांत सोने तब्बल ५१५० रूपयांनी स्वस्त झाल्याची नोंद घेण्यात आली. त्यात आणखी बुधवारची भर पडल्याने सोन्याचे दर तीनच दिवसांत ६६९५ रूपयांनी कमी झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.















Discussion about this post