Sunday, March 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुंबई महापालिकेत वंचितचा काँग्रेसला पहिला धक्का ; 62 पैकी फक्त 46 जागांवरच अर्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 31, 2025
in महाराष्ट्र
0
मुंबई महापालिकेत वंचितचा काँग्रेसला पहिला धक्का ; 62 पैकी फक्त 46 जागांवरच अर्ज
बातमी शेअर करा..!

अपूर्ण उमेदवारीमुळे काँग्रेस अडचणीत

मुंबई । मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस–वंचित बहुजन आघाडीच्या युतीत समन्वयाचा अभाव उघड झाला आहे. जागावाटपानंतर उमेदवारी अर्ज भरण्यात झालेल्या गोंधळामुळे काँग्रेसच्या रणनीतीला मोठा फटका बसल्याचे चित्र आहे.

देशभराचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस–वंचित युतीला सुरुवातीलाच धक्का बसला आहे. युतीअंतर्गत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला 62 जागा सोपवल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात वंचितकडून केवळ 46 जागांवरच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. उर्वरित 16 जागांवर उमेदवार न मिळाल्याने अर्ज भरलेच गेले नाहीत.

या बाबतची माहिती अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर काँग्रेसपर्यंत पोहोचल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली. वेळेत माहिती न मिळाल्यामुळे काँग्रेसलाही त्या जागांवर अधिकृत उमेदवार उभे करता आले नाहीत. परिणामी, काही प्रभाग काँग्रेसच्या हातातून निसटले. युती टिकवण्यासाठी काँग्रेसकडून मुंबईतील अनेक प्रभाग वंचितला देण्यात आले होते, जिथे काँग्रेसची संघटनात्मक पकड तुलनेने मजबूत होती. मात्र मुंबईत वंचितची संघटनात्मक तयारी अपुरी ठरल्याने अनेक ठिकाणी उमेदवार उभे राहू शकले नाहीत. यामुळे युतीतील नियोजन आणि संवादावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आता या 16 प्रभागांमध्ये अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या बंडखोर उमेदवारांनाच काँग्रेसकडून अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याची वेळ आली आहे. यामुळे अधिकृत युतीचा निर्णय काँग्रेससाठी अडचणीचा ठरल्याचे स्पष्ट होत आहे.या घडामोडींमुळे मुंबईतील काँग्रेसची निवडणूक रणनीती विस्कळीत झाली असून, युतीतील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. 1999 नंतर प्रथमच काँग्रेस राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय असताना, मुंबईतील हा गोंधळ पक्षाला महागात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, काँग्रेस राज्यभरात आक्रमक पवित्रा घेत असून मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख महापालिकांमध्ये मोठ्या संख्येने जागांवर निवडणूक लढवत आहे. नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूरमध्ये पक्ष स्वबळावर मैदानात उतरला आहे.
मुंबई महापालिकेतील हा प्रकार काँग्रेस–वंचित युतीच्या भविष्यासाठी इशाराच ठरणार का, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावच्या गोलाणी मार्केट परिसरात थरार : जुन्या वादातून तरुणावर चाकूने सपासप वार

Next Post

वर्षाच्या अखेरीस सोन्याचा भाव घसरला, ग्राहकांना सुखद धक्का; जळगावात असे आहेत भाव?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली

वर्षाच्या अखेरीस सोन्याचा भाव घसरला, ग्राहकांना सुखद धक्का; जळगावात असे आहेत भाव?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

March 1, 2026
बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page