जळगाव । मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन बडनेरा – नाशिकरोड अनारक्षित विशेष गाडीचा कालावधी येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
बडनेरा – नाशिकरोड अनारक्षित दैनिक विशेष गाडी ३१ डिसेंबरपर्यंत चालवली जाणार होती. परंतु तिचा कालावधी आता १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. या गाडीच्या ५९ फेऱ्या होतील. तसेच नाशिकरोड – बडनेरा फेरीसुद्धा आता २८ फेब्रुवारी २६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. वरील दोन्ही गाड्यांच्या वेळापत्रकात, संरचनेत व थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
वेळापत्रक जाणून घ्या?
ही गाडी सकाळी १०.०५ वाजता बडनेरा येथून सुटते. १०.३० मूर्तिजापूर, १०.४९ बोरगाव, ११.०२ अकोला, ११.३३ शेगाव, दुपारी १२.०३ नांदुरा, १२.३८ मलकापूर, १.३७ बोदवड, ३.०५ भुसावळ, ३.३५ जळगाव, ४.०६ पाचोरा, ४.१९ कजगाव, सायंकाळी ४.३९ चाळीसगाव, ५.२० नांदगाव, ५.५० मनमाड, ६.०६ लासलगाव, ६.२५ निफाड, ७.०५ नाशिक रोड स्थानकावर येते.















Discussion about this post