कर्नाटकामधून एक भयंकर घटना समोर आलीय. ज्यात कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरच्या धडकेत स्लीपर बसला लागलेल्या भीषण आगीत १७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. २२ जण गंभीर जखमी आहेत.
ही घटना चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियुर परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूहून शिवमोगाच्या दिशेने सीबर्ड कोच ही खासगी स्लीपर बस ३२ प्रवाशांना घेऊन जात होती. याच दरम्यान समोरून येणाऱ्या एका वेगवान कंटेनरने अचानक दुभाजक ओलांडला आणि थेट बसला समोरून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या डिझेल टाकीचा स्फोट झाला आणि बसने पेट घेतला.
अवघ्या काही क्षणात या आगीने रौद्र रूप धारण केल्याने प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. यामध्ये १७ जणांचा होरपळून जिवंत मृत्यू झाला. या अपघातात २२ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post