जळगाव । महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून मात्र जळगाव मनपात महायुतीमधील घटना पक्ष युती करणार की स्वतंत्र लढणार? याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता होती. अखेर युतीवर शिक्कामोर्तब झाले. जळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटाच्या युतीची आज घोषणा करण्यात आली
जळगाव मनपा निवडणुकीच्या रणनीतीसाठी आज एमआयडीसी परिसरातील एका खासगी हॉटेलमध्ये एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, खासदार स्मिताताई वाघ, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, आमदार चंद्रकांत सोनवणे आणि आमदार अमोल पाटील यांसह दोन्ही पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून युती होणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता होती, ज्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.
भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली असली तरी, महायुतीचा तिसरा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. या संदर्भात माहिती देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन जागावाटपाचा अंतिम निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादीला सोबत घेऊन जळगावात ‘महायुती’चाच झेंडा फडकवण्याचा विश्वास नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.















Discussion about this post