Sunday, March 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

विज्ञान पुरस्कारांचे वितरण; प्रा.जयंत विष्णू नारळीकर यांचा मरणोत्तर विज्ञान रत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 24, 2025
in जळगाव जिल्हा
0
विज्ञान पुरस्कारांचे वितरण; प्रा.जयंत विष्णू नारळीकर यांचा मरणोत्तर विज्ञान रत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । भारत सरकारच्या वतीने विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उत्कृष्ट योगदानासाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 चे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले. प्रसिद्ध खगोल भौतिकशास्त्रज्ञ कै. प्रा. जयंत विष्णू नारळीकर यांना ‘विज्ञान रत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात आले.तसेच अन्य दोन श्रेणीमध्य महाराष्ट्रातील 6 शास्त्रज्ञ आणि संशोधकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि संशोधकांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानासाठी, विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा आणि विज्ञान टीम, या चार श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात आजीवन योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना देण्यात येणारा विज्ञानरत्न पुरस्कार प्रसिद्ध खगोल भौतिकशास्त्रज्ञ कै. प्रा. जयंत विष्णू नारळीकर मरणोत्तर प्रदान करण्यात आला. त्यांच्यावतीने आयुकाचे संचालक डॉ. रघुनाथन श्री आनंद यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

स्व. नारळीकर यांनी ‘होयल-नारळीकर सिद्धांत’ विकसित करून गुरुत्वाकर्षण आणि द्रव्य निर्मितीचे एकत्रीकरण करणारा स्थिर अवस्था ब्रह्मांडाचा आराखडा मांडला होता. तसेच, ‘क्वासी-स्टेडी स्टेट कॉस्मॉलॉजी’ मॉडेलद्वारे कॉस्मिक बॅकग्राउंड रेडिएशन आणि दीर्घिकांच्या निर्मितीचे स्पष्टीकरण दिले होते.

विज्ञान श्री पुरस्काराने नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस. वेंकट मोहन, यांना पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच न्यूट्रॉन बीमलाइन्स आणि सुपरकंडक्टिव्हिटी क्षेत्रातील योगदानासाठी (परमाणु ऊर्जा) डॉ. युसूफ मोहम्मद सेख (BARC, मुंबई यांसह – कृषी विज्ञानसाठी: डॉ. ज्ञानेंद्र प्रताप सिंह (ICAR-नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, नवी दिल्ली) – जीव विज्ञान क्षेत्रातील मानवी जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे रोग संवेदनशीलता आणि इतिहासाचे संशोधना साठी डॉ. कुमारसामी थंगराज (CSIR-CCMB, हैदराबाद), रसायनशास्त्र क्षेत्रात स्वस्त पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रा. तलाप्पिल प्रदीप (IIT मद्रास),प्रा अनिरुद्ध भालचंद्र पंडित (इंजीनियरिंग विज्ञान), ; प्रा. महान एमजे (गणित आणि कंप्यूटर विज्ञान); श्री जयन एन (अंतरिक्ष विज्ञान आणि प्रौद्योगिकी)यांना विज्ञान श्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.

विज्ञान युवा या श्रेणीत विविध क्षेत्रांतून अनेक युवा संशोधकांना सन्मानित करण्यात आले, ज्यात भौतिकशास्त्रात प्रा. अमित कुमार अग्रवाल आणि प्रा. सुहृद श्रीकांत मोरे; गणित आणि संगणक विज्ञानात प्रा. सब्यसाची मुखर्जी आणि प्रा. श्वेता प्रेम अग्रवाल; अभियांत्रिकी विज्ञानात प्रा.. आर्कप्रभा बासू; वैद्यकीय क्षेत्रात डॉ. सुरेश कुमार; अंतराळ विज्ञानात श्री अंकुर गर्ग; तंत्रज्ञान आणि नाविन्यात प्रा. मोहनशंकर शिवप्रकाशम,

डॉ. जगदीस गुप्ता कपुगंती (कृषि विज्ञान); डॉ. सतेन्द्र कुमार मंगरौठिया (कृषि विज्ञान); श्री देबार्का सेनगुप्ता (जैविक विज्ञान); डॉ. दीपा अगाशे (जैविक विज्ञान); डॉ. दिब्येंदु दास (रसायन विज्ञान); डॉ. वलीउर रहमान (पृथ्वी विज्ञान) यांचा समावेश आहे.अरोमा मिशन टीमला सुगंधी पिकांच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्रामीण रोजगार वाढवल्याबद्दल विज्ञान टीम पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव महापालिकेत भाजप-शिंदे गटाची युती तुटली? निवडणुकीपूर्वी मोठ्या घडामोडी !

Next Post

२० वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकत्र, मनसे-शिवसेना युतीची अधिकृत घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
२० वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकत्र, मनसे-शिवसेना युतीची अधिकृत घोषणा

२० वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकत्र, मनसे-शिवसेना युतीची अधिकृत घोषणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

March 1, 2026
बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page