Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर गिरीश महाजनांनी खडसे कुटुंबावर फोडलं

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 21, 2025
in जळगाव जिल्हा
0
खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, हे लावलं, ते लावलं, आधी..; गिरीश महाजन खडसेंवर बरसले
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगावच्या मुक्ताईनगर नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मुलीचा विजय झाला आहे.चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना पाटील हीच 2561 मतांनी विजय झाला आहे. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या भाजपचं नेतृत्व करत होत्या. त्यांना मतदारांनी नाकारल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर गिरीश महाजनांनी खडसे कुटुंबावर फोडलं

एकनाथ खडसे हा माणूस आमच्यासाठी अपशकुन ठरला असल्याचे वादग्रस्त विधान गिरीश महाजन यांनी केले आहे. त्यामुळे जळगाव येथे राजकीय वातावरण तापले असून महाजन-खडसे वाद पुन्हा एकदा पेटल्याचे दिसत आहे.

मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष या ठिकाणी केंद्रित झाले होते. प्रचारादरम्यान आरोप–प्रत्यारोप, वादग्रस्त विधानं आणि राजकीय तणाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे स्वतः प्रचारात सक्रिय झाल्याने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र, निकालात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील यांनी तब्बल 2,583 मतांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला, आणि मुक्ताईनगरमध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला. या निकालाकडे पाहता, ही केवळ स्थानिक विजय-पराभवाची लढाई न राहता, खडसे कुटुंबासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी थेट एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधत, “एकनाथ खडसे हा माणूस आमच्यासाठी अपशकुन ठरला आहे,” असे विधान केले. ते पुढे म्हणाले की, “एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटात असताना भाजपच्या व्यासपीठावर येऊन प्रचार करतात, हे कार्यकर्त्यांना आणि मतदारांना पटले नाही. याचा थेट फटका आम्हाला बसला.

महाजन यांनी खडसे कुटुंबाच्या राजकीय ताकदीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “एकनाथ खडसे यांचं आता काहीही राजकीय वजन उरलेलं नाही. दोन वेळा त्यांची मुलगी विधानसभेत उभी राहिली, पण दोन्ही वेळा मोठ्या फरकाने पराभूत झाली,” असा टोला त्यांनी लगावला. मुक्ताईनगरमध्ये भाजपची जागा गमवावी लागल्याची खंत व्यक्त करत, या पराभवामागे खडसे कुटुंबच जबाबदार असल्याचा आरोप, महाजन यांनी केला. दरम्यान, या आरोपांमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि जुन्या वादांचे पडसाद आगामी काळात अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. मुक्ताईनगरचा निकाल हा केवळ नगरपंचायतीपुरता मर्यादित न राहता, जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा देणारा ठरत असल्याचे चित्र आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भुसावळमध्ये मंत्री सावकारेंच्या पत्नीचा पराभव; शरद पवार गटाच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

Next Post

प्रवाशांना धक्का ! रेल्वे प्रवास आणखी महागला, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रेल्वेच्या वेटिंग तिकिटांबाबत नवीन नियम ; आताच जाणून घ्या काय आहे?

प्रवाशांना धक्का ! रेल्वे प्रवास आणखी महागला, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

February 27, 2026
महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ ; अशी आहे वाढीव शुल्क आकारणी

जळगाव शिक्षण विभागाचा अजब कारभार! ११ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले; अहवालात नोंद मात्र शून्य!

February 27, 2026
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

February 27, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

जळगाव जिल्हा तापला! फेब्रुवारीतच तापमानाने ३५ अंशांचा टप्पा ओलांडला, उकाड्याने जळगावकर हैराण

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page