जळगाव/मुंबई । जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी किमान तापमानात चढ-उतार होत असून थंडीची लाट काहीशी ओसरली आहे. मात्र गारठा कायम आहे. आज राज्याच्या किमान तापमानात काही अंशी वाढ होण्याची, तसेच थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीचा लाट, तर तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचे समजले जाते. बुधवारी धुळे येथे ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, निफाड आणि जेऊर येथे ८ अंश कमी तापमानाची नोंद झाली. आज राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होत, थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान जळगाव शहरासह जिल्ह्यात पुढील पाच दिवस म्हणजेच २२ डिसेंबरपर्यंत किमान तापमान ८ ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरणार असून, कमाल तापमान २९ ते ३१ अंशांपर्यंत राहील. सकाळी धुके आणि रात्री कुडकुडणारी थंडी राहील. दुपारची वेळ मात्र उबदार राहण्याची शक्यता आहे. १९, २१ आणि २२ डिसेंबरला थंडीची तीव्रता जास्त राहण्याचे संकेत आहे.
या काळात किमान तापमानात आणखी काही अंशी घट होऊ शकते. महासागरातील थंड पाण्यामुळे उत्तर भारतातून कोरडे उत्तर-पश्चिम वारे दक्षिणेकडे सरकू लागले आहेत. यामुळे रेडिएटिव्ह कूलिंग रात्रीची थंड होण्याची प्रक्रिया वेगवान होत आहे. परिणामी धुक्याचे प्रमाण वाढत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स कमकुवत असल्यामुळे असल्याने थंडी तीव्र होत आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली आहे.















Discussion about this post