जळगाव । या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात वाढ झाली होती. मात्र आज आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी सोने दरात ८०० रूपयांपेक्षा अधिक घट नोंदवली गेली. त्यामुळे लग्नसराईसाठी सोने खरेदीकरीता आलेल्या ग्राहकांना सुखद धक्का बसला.
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेतही सोमवारी दिवसभरात ३०९ रूपयांची किंचित वाढ नोंदवली गेल्याने सोने जीएसटीसह एक लाख ३२ हजार ३५५ रूपयांपर्यंत वधारले होते. तर आज मंगळवारी सकाळी बाजार उघडल्यावर प्रति १० ग्रॅम ८२४ रूपयांची घट झाली. त्यामुळे सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह एक लाख ३१ हजार ५३१ रूपयांपर्यंत खाली आले.
चांदीच्या दरात स्थिरता
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी दिवसभरात कोणतीच वाढ अथवा घट नोंदवली गेली नाही. त्यामुळे चांदीचे दर एक लाख ८५ हजार ४०० रूपयांवर स्थिर राहिले. आज मंगळवारी सकाळी देखील कोणताच बदल नोंदवला गेला नाही. त्यामुळे चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली.















Discussion about this post