मुंबई । राज्याच्या राजकारणात आज कॅश बॉम्बने धमाका केला आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदेंचे आमदार महेंद्र दळवींचा कॅशसोबत व्हिडिओ समोर आणून एकच खळबळ उडवली.यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पीडब्लूडीच्या अधिकाऱ्यांचा लाच घेतानाच व्हिडिओ समोर आणला आहे.
यामुळेव ऐन हिवाळी अधिवेशनात ठाकरे बंधूंच्या दोन शिलेदारांनी व्हिडीओ समोर आणले आहेत. यामुळे राजकारण आणखी तापणार असून आरोप प्रत्यारोप होणार असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडीओला संदीप देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम खाते? की फक्त “खाते ” असे म्हणत भष्ट्राचाराचा आरोप केला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाले की, पीडब्ल्युडीच्या हाफकीन शाखेत शाखा अभियंता शासनाकडून येणाऱ्या निधीतील टक्केवारी घेतानाच व्हिडिओ समोर आणला आहे. 2 लाख 80 हजार रुपये केवळ शासनाचा निधी आणण्याकरता घेतले जात आहेत. निधी मिळण्यापूर्वीच कंत्राटदाराकडून पैसे घेतले जातात. आधी कंत्राटदारांकडून काही ठराविक टक्केवारी घेतली जायची. मात्र आता निधी आणण्याचे, वर्क ऑर्डर काढण्याचे आणि अंतिम बिलाची वेगवेगळी टक्केवारी घेतली जाते. इतकेच नाही तर भ्रष्टाचाराच्या टक्केवारीत कंत्राटदारांची बोलीही लागली जाते असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.















Discussion about this post