जळगाव : जळगाव शहरातील आहुजा नगर स्टॉपजवळ मध्यरात्री दोनच्या सुमारास मोठा अपघात घडला. आहूजा नगरकडून अचानक मुंबई–नागपूर हायवेवर आलेल्या भरधाव ट्रॅक्टरला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. ट्रकमधील शेकडो टन अद्रक अपघातानंतर रस्त्यावर विखुरले त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे.
सुदैवाने, या अपघातात ट्रक चालक आणि क्लीनर दोघेही सुखरूप आहेत. जळगाव शहरातील बांभोरी ते खोटे नगर स्टॉप या दरम्यान महामार्गावर सध्या समांतर रस्त्यांचे काम सुरू आहे. रस्त्यांचे काम सुरू असल्यामुळे या परिसरात छोटे-मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी आणि वाहनचालकांनी या भागात अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
या अपघातामुळे विस्कटलेली वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी आणि रस्त्यावर विखुरलेले अद्रक बाजूला करण्यासाठी पोलीस आणि महामार्ग यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.















Discussion about this post