मुंबई | राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 9 डिसेंबर रोजी कोर्टात हजार राहण्याचे आदेश दिले आहे. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे रोहित पवार यांनी बदनामी केल्याचा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला. याप्रकरणी रोहित पवार यांना आता न्यायलयात हजर राहावे लागणार आहे.
विधान परिषदेत तत्कालीन कृषिमंत्री आणि विद्यमान क्रीडामंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहातील कामकाज सुरू असताना मोबाईलवर ‘ऑनलाइन रमी’ हा जुगार खेळत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. ज्याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला होता. यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. परिणामी माणिकराव कोकाटे यांचे खाते देखील बदलण्यात आले.
त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवार यांच्या विरोधात बदनामीचा दावा दाखल केला. आता न्यायालयाने थेट आमदार रोहित पवार यांना न्यायालयात उपस्थित राहून बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, ‘जंगली रमी’ची जाहिरात बंद करताना 15 मिनिटे लागली आणि तोच व्हिडिओ रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला. महत्त्वाचे म्हणजे रोहित पवार हे विधान परिषद सदस्य नसतानाही त्यांच्याकडे व्हिडिओ कसा पोहोचला? हा मुद्दा कोकाटे यांनी उपस्थित करत चौकशीची मागणी केली















Discussion about this post