मुक्ताईनगर । आज राज्यभरात अनेक ठिकाणी नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. याच दरम्यान जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये स्थानिक भाजप उमेदवारांचे काही वाहने पोलिसांनी थांबवल्यानंतर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे स्वतः घटनास्थळी पोहोचल्या आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर संतापल्या. या दरम्यान काही मिनिटे तीव्र शाब्दिक चकमक झाली. या प्रकारामुळे जुन्या शहरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
जुने शहरात मतदान सुरळीत सुरू असताना भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी किंवा कार्यकर्त्यांना नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वाहनांना पोलिसांनी अडवले. ही माहिती मिळताच रक्षा खडसे तातडीने त्या ठिकाणी गेल्या आणि वाहनांना अडवल्याबाबत पोलिसांना विचारणा केली. त्यावर घटनास्थळी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी मंत्री खडसे यांना सांगितले की, ते विशेष बंदोबस्तासाठी पुण्याहून आले असून स्थानिक पक्षनेते किंवा कार्यकर्ते कोण आहेत याची त्यांना माहिती नाही. त्यांनी स्पष्ट केले की, ते केवळ दिलेल्या आदेशांनुसारच काम करत आहेत.
पोलिसांचे उत्तर ऐकल्यानंतर रक्षा खडसे यांनी वारंवार होणाऱ्या अडथळ्यांवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, नियम सर्वांना सारखे लागू केले पाहिजेत. सगळ्यांवर एकच नियम लागू करा. आमच्या वाहनांना अडवणार असाल तर इतरांचेही वाहने थांबवा, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.















Discussion about this post