नवी दिल्ली । देशातील मेडिकल शिक्षण क्षेत्राला हादरवणारा घोटाळा उघडकीस आला आहे. प्रवर्तन निदेशालयाच्या (ED) अनेक टीम्सनी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगण, मध्यप्रदेश ,छत्तीसगढ़, गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यातील 15 ठिकाणी छापे टाकले. कथित भ्रष्टाचार आणि लाचखोरीप्रकरणी हे छापे टाकण्यात आले,
केंद्रीय आरोग्य मंत्रालयासह नॅशनल मेडिकल कमिशनकडून होणाऱ्या ह्या गैरप्रकारमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ईडीने केलेल्या या कारवाईनंतर देशातील मेडिकल शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ED ने 15 जागी छापे टाकले, ज्यामध्ये अनेक राज्यांमध्ये असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या सात कॅम्पस आणि एफआयआर मध्ये, आरोपी म्हणून नामांकित काही खाजगी व्यक्तींचा समावेश आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआय ने 30 जून रोजी 36 जणांविरुद्ध दाखल केलेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी ईडीने सुरू केली. विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) माजी अध्यक्ष डी पी सिंग यांचा आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. सिंग हे सध्या टाटा इन्स्टिट्युट ऑप सोशल स्टडीज (मुंबई) चे चान्सरलही आहेत. तसेच यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे अधिकारी आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे (एनएमसी) सदस्यांचा देखील समावेश आहे.















Discussion about this post