रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. साउथ ईस्टर्न रेल्वेत सध्या अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १७८५ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १८ नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०२५ आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत. rrcser.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.
पात्रता
रेल्वेतील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी आणि १२वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. या नोकरीसाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
रेल्वेतील या नोकरीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरायचे आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरायचे नाही.
अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करताना सर्वात आधी rrcser.co.in वेबसाइटवर जावे.
यानंतर भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करा.
यानंतर रजिस्टर बटणवर क्लिक करुन तुमची सर्व माहिती भरा.
यानंतर पुन्हा एकदा लॉग इन करा अर्ज पू्र्ण भरा.
यानंतर अर्ज सबमिट करण्यापूर्वी प्रिंट आउट काढून ठेवा.















Discussion about this post