जळगाव । राज्यातील नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून यासाठी ३ डिसेंबर रोजी निवडणूक पार पडणार आहे.. तर ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या छाननी प्रक्रियेत भाजपाला पहिली आघाडी मिळाली आहे.
जिल्ह्यातील जामनेर, भुसावळ आणि सावदा येथे भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे समजते. भुसावळ येथे प्रभाग 7 ब मधील प्रीती मुकेश पाटील, सावदा येथील प्रभाग 7 मधील रंजना भारंबे आणि जामनेर येथील प्रभाग 11 ब मधील उज्वला दीपक तायडे हे भाजप उमेदवार बिनविरोध ठरले. याबाबत अधिकृत घोषणा मात्र माघारीची अंतिम मुदत संपल्यानंतर करण्यात येणार आहे.















Discussion about this post