बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. बांग्लादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरण कोर्टाने शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2024 च्या हिसांचार प्रकरणात शेख हसीना यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.
आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण सोमवारी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध निकाल देत आहे त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. सन 2024 साली हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. या हिंसक आंदोलनामध्ये हत्या आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचे आरोप माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर ठेवण्यात आले होते. कोर्टाने शेख हसीना यांना १४०० जणांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत त्यांना ही शिक्षा सुनावली आहे.















Discussion about this post