मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे, मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढलं आहे.
करमाळयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिवसेना शिंदे गटाकडून नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जयवंत जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती होताच शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत सामूहिक राजीनामा दिला आहे.
जगताप यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या दिग्विजय बागल यांच्या गटातील तब्बल 55 शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.
एवढंच नाही तर या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केलेले 20 हजार सभासद देखील पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा निर्णय शिवसेना शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या सामूहिक राजीनाम्यामुळे करमाळा शहरातील शिवसेना शिंदे गटाची ताकद कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.















Discussion about this post