मुक्ताईनगर । एकनाथ शिंदे यांनी आपले विश्वासू शिलेदार आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर नगरपरिषद आणि नगरपंचायतीची जबाबदारी सोपवताच त्यांनी एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगरमध्ये मोठा धक्का दिला आहे.
एकनाथ खडसे यांचे जवळचे विश्वासू पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते यांनी, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष शकील जनाब, युवक अध्यक्ष अशा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश केला. हा एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
काही वर्षांपूर्वी एकनाथ खडसे यांची जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर एकहाती पकड होती. पण मागच्या काही काळात त्यांची पिछेहाट झाली. भाजपच्या अंतर्गत राजकारणात एकनाथ खडसे हे बाजूला गेले. सध्या ते आणि त्यांच्या कन्या रोहणी खडसे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत. वाढतं वय आणि वृद्धत्व यामुळे एकनाथ खडसे यांची आता जिल्ह्याच्या राजकारणावर पूर्वीसारखी पकड राहिलेली नाही. त्यांना आव्हान देणारे अनेक नेते आता जिल्ह्यात आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर जळगावमधील तीन नगरपंचायतींची जबाबदारी सोपवण्यात आली. यात रावेर, सावदा आणि मुक्ताईनगरची नगरपंचायत आहे. जबाबदारी मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपली चुणूक दाखवून दिली व एकनाथ खडसे यांना पहिला धक्का दिला.















Discussion about this post