जळगाव । रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. दक्षिण पूर्व रेल्वेच्या शालिमार स्थानकावर सुरू असलेल्या यार्ड रिमॉडेलिंग कामामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या एकूण चार रेल्वे गाड्या रद्द, तर गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत. यामुळे भुसावळ विभागातून प्रवाशांची सुद्धा गैरसोय होईल.
रेल्वे स्थानकासह परिसरातील कामांसाठी हा ब्लॉक घेतला आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या चार रेल्वे गाड्या रद्द असतील. त्यात १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस – शालिमार एक्स्प्रेस ही गाडी १३ ते १९, २२ व २३ नोव्हेंबर या काळात रद्द असेल. तर १८०३० शालिमार – एलटीटी एक्सप्रेस १३ ते २१ नोव्हेंबर, १२१५१ एलटीटी शालिमार एक्स्प्रेस १२, १३ व १९ नोव्हेंबर आणि १२१५२ शालिमार -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १४, १५ व २१ नोव्हेंबरला रद्द असेल. परिणामी या गाड्यांचे आरक्षण असलेल्यांची गैरसोय होईल.
शॉर्ट टर्मिनेट गाड्या अशा
१२१०१ एलटीटी – शालिमार एक्स्प्रेस १८ नोव्हेंबरला संत्रागाची, १२१०२ शालिमार – एलटीटी एक्स्प्रेस २० नोव्हेंबरला संत्रागाची येथून नियोजित वेळेत सुटेल. १२९०५ पोरबंदर – शालिमार १९ नोव्हेंबर रोजी संत्रागाची येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल. तर १२९०६ शालिमार – पोरबंदर ही २१ नोव्हेंबर रोजी संत्रागाची येथून नियोजित वेळेला सुटेल.















Discussion about this post