महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) गट-अ (Group-A) संवर्गातील तब्बल १४४० रिक्त पदांसाठी सरळसेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आरोग्य विभागातील ही सर्वात मोठी पदभरती असून, वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी शासकीय सेवेत रुजू होण्याची ही सुवर्णसंधी आहे.
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया अद्याप सुरु झालेली नाहीय. वैद्यकीय ग्रुप ए पदासाठी निवड झाल्यावर उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळणार आहे. ५६१०० ते १,७७,५०० रुपये वेतनश्रेणीनुसार पगार मिळणार आहे.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालीलपैकी एक अर्हता असणे आवश्यक आहे:
संविधानिक विद्यापीठाची एम.बी.बी.एस. (M.B.B.S.) पदवी. किंवा
एम.बी.बी.एस. पदवी आणि पदव्युत्तर पदवी/पदविका (Post Graduate Degree/Diploma).
उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी संबंधित वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
यामध्ये महिलांसाठी ४३१ जागा राखीव आहेत. खेळाडूंसाठी ७२ जागा तर अनाथ मुलांसाठी १४ पदे राखीव आहेत.यामध्ये त्यामध्ये VJ- NT- अ,ब,क,ड जसे की भटक्या जाती-जमाती प्रवर्ग (धनगर- वंजारी) साठी शून्य जागा देण्यात आल्या आहेत.
मागील काही बिंदू नामावली मध्ये वारंवार भटक्या जाती -जमाती प्रशासनातली वरिष्ठ अधिकारी या समाजावर अन्याय करत आहे.आरक्षणाप्रमाणे त्या – त्या प्रवर्गासाठी राखीव जागा ठेवणे अपेक्षित आहे. त्या त्या पदभरतीसाठी जागा राखीव न ठेवता भरती केल्यास सरकारला येणाऱ्या काळात मतदानास्वरूपी किंमत मोजावी लागेल, असं सांगितलं आहे.















Discussion about this post