Wednesday, June 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

आज, 1 नोव्हेंबरपासून पैसे आणि बँक व्यवहारांचे नियम बदलले! काय आहेत लगेचच घ्या जाणून

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 1, 2025
in राष्ट्रीय, वाणिज्य
0
आज, 1 नोव्हेंबरपासून पैसे आणि बँक व्यवहारांचे नियम बदलले! काय आहेत लगेचच घ्या जाणून
बातमी शेअर करा..!
मुंबई । दर महिलेच्या पहिल्या तारखेला अनेक नियम बदलत असतात. त्याचनुसार आजपासून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाशी आणि बँकिंग सेवांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण नियमांमध्ये बदल झाले आहेत. जर तुमचं बँक खाते, एसबीआय क्रेडिट कार्ड किंवा शासकीय पेन्शन यापैकी कुठल्याही सेवेशी नातं असेल, तर हे नवे नियम आता तुमच्यावर लागू झाले आहेत. रिझर्व्ह बँक आणि वित्त मंत्रालयाने जारी केलेले हे नियम 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू झाले आहेत.
या नव्या नियमानुसार, बँक खात्यात चार नॉमिनी जोडण्याची सुविधा, एसबीआय कार्डवर १% नवीन शुल्क, युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) साठी नवीन अंतिम तारीख, तसेच पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुधारित प्रक्रिया यांचा समावेश आहे. या बदलांचा उद्देश बँकिंग प्रणाली अधिक पारदर्शक, डिजिटल आणि सुलभ बनवणे हा आहे.
1. बँक खात्यांमध्ये चार नॉमिनी जोडण्याची नवी सुविधा
आता बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजपासून तुम्ही तुमच्या बँक खात्यात चार नॉमिनीपर्यंत नोंदणी करू शकता. यापूर्वी फक्त एकाच व्यक्तीला नॉमिनी म्हणून नोंदवण्याची परवानगी होती. नवीन व्यवस्थेनुसार, ग्राहक इच्छेनुसार सर्व नॉमिनी एकाच वेळी (simultaneous) किंवा एकामागोमाग (successive) जोडू शकतात. त्यामुळे भविष्यात क्लेम प्रक्रिया अधिक सोपी होईल. मात्र, बँक लॉकरसाठी फक्त क्रमवार नॉमिनेशनचीच सुविधा लागू असेल. म्हणजे, जर पहिला नॉमिनी उपलब्ध नसेल, तरच दुसरा नॉमिनी त्याची जागा घेऊ शकेल.
2. एसबीआय कार्डवर 1% अतिरिक्त शुल्क लागू
देशातील सर्वात मोठी कार्ड सेवा देणारी कंपनी एसबीआय कार्डने आजपासून आपल्या शुल्क संरचनेत बदल केला आहे.
आता जर तुम्ही CRED, Cheq किंवा MobiKwik सारख्या थर्ड पार्टी अॅपद्वारे शाळा किंवा कॉलेजची फी भरत असाल, तर तुम्हाला 1% अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. मात्र, जर तुम्ही थेट शाळेच्या वेबसाइटवरून किंवा त्यांच्या POS मशीनद्वारे पेमेंट केले, तर कोणताही अतिरिक्त चार्ज आकारला जाणार नाही.
याशिवाय, काही निवडक श्रेणींमध्ये ₹1,000 पेक्षा अधिक वॉलेट टॉप-अप केल्यासही आता 1% शुल्क लागू होईल. हा बदल आजपासून लागू झाला असून कार्डधारकांनी याची नोंद घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.
3. युनिफाइड पेन्शन योजना (UPS) साठी अंतिम मुदत वाढवली
केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिलासा देत युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) मध्ये सहभागी होण्यासाठीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 30 सप्टेंबर होती, परंतु कर्मचाऱ्यांच्या आणि विविध विभागांच्या मागणीवरून सरकारने ती दोन महिन्यांनी पुढे ढकलली आहे.
4. पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरू
आजपासून केंद्र आणि राज्य सरकारच्या पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे प्रमाणपत्र तुम्ही Jeevan Pramaan Portal वरून डिजिटल पद्धतीने किंवा जवळच्या बँक व पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जाऊन जमा करू शकता. या प्रक्रियेची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. जर या तारखेपर्यंत जीवन प्रमाणपत्र जमा केले नाही, तर पेन्शन वितरणात अडचणी निर्माण होऊ शकतात.
बातमी शेअर करा..!
Previous Post

म्हणून आम्ही दोघे एकत्र आलो.. सत्याचा मोर्चातून उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण

Next Post

ॲग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकरी खातेदारांना नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

ॲग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकरी खातेदारांना नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बंद पडलेली ‘शिवभोजन केंद्रे’ लवकरच सुरू होणार; मंत्री छगन भुजबळांची मोठी घोषणा

बंद पडलेली ‘शिवभोजन केंद्रे’ लवकरच सुरू होणार; मंत्री छगन भुजबळांची मोठी घोषणा

June 24, 2026
तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी! इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी! इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

June 24, 2026
अमळनेरात काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईच्या डोळ्यादेखत मुलाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू

अमळनेरात काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईच्या डोळ्यादेखत मुलाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू

June 24, 2026
चाळीसगावात पोलिसांचे ‘मिशन ऑल आऊट’; ४४ गुन्हेगार ताब्यात, ३९ लाखांच्या कार्ससह शस्त्रे जप्त!

चाळीसगावात पोलिसांचे ‘मिशन ऑल आऊट’; ४४ गुन्हेगार ताब्यात, ३९ लाखांच्या कार्ससह शस्त्रे जप्त!

June 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page