जळगाव । दिवाळीनंतर राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे कापूस, मका, सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यातच राज्यावरील पावसाचं सावट कायम असून भारतीय हवामान विभागानेही पावसाचा मोठा इशारा दिला.
पुढील काही दिवस पावसाचे ढग राज्यावर कायम असणार आहे. पुढील दोन दिवस जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. फक्त पुणेच नाही तर राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील काही दिवस वादळी वा-यासह जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात काही भागात पावसाचा तडाखा बसण्याचा अंदाज आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, रायगड, मध्य मध्य महाराष्ट्र, सोलापूर, पुणे, आहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड, लातूर, धाराशिव, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, नांदेड या भागात वादळी वा-यासह पावसाचा अंदाज आहे.
अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील आठवड्यातील बुधवारपर्यंत कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतरण होणार असून अरबी समुद्रातील क्षेत्रामुळे मुंबईसह लगतच्या परिसरांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.















Discussion about this post