सातारा ।साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने गुरुवारी (20 ऑक्टोबर) रात्री शहरातील एका नामांकित हॉटेलच्या बंद खोलीत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालंय.
महीला डॅाक्टरने आपल्या हातावर नोट लिहिल्याचं उघड झालंय. हातावर लिहिलेल्या मजकुरात त्यांनी एका पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदनेचं नाव नमूद केलंय. धक्कादायक बाब म्हणजे, या मजकूरानुसार, पीएसआय बदनेनं आपल्यावर चार वेळा अत्याचार केल्याचं डॉक्टरनं नमूद केलंय. तसंच पोलीस प्रशांत बनकरनं गेले 4 महिने शाररिक आणि मानसिक छळ केलाय. या घटनेनं फलटणमधील वैद्यकीय आणि पोलीस वर्तुळात मोठी चर्चा सुरू झालीय.
मृत तरुणी मूळची बीड जिल्ह्यातील असून, गेल्या दोन वर्षांपासून फलटण येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होती. या प्रकरणाला आता गंभीर वळण लागले असून, तिच्यावर पोलिस आणि राजकीय दबाव होता, तसेच पोलिस अधिकाऱ्याने अत्याचार केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान या घटनेमुळे सध्या राज्यभरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही पोलिसांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या घटनेच्या चौकशीचे देखील आदेश देण्यात आले आहेत.
या घटनेमुळे राजकारण देखील चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुष्मा अंधारे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, ‘फलटणमध्ये एका डॉक्टर महिलेने केलेली आत्महत्या ही नुसती दुर्दैवी नाही. तर अत्यंत चिंतनिय बाब आहे. कामाच्या ठिकाणी शासकीय स्तरावर महिलांचा अशा पद्धतीने त्यांना मेंटली टॉर्चर होणार या संबंधाने खरंतर पूर्व प्रतिबंधात्मक कायदे अधिक कठोर करण्याची गरज आहे. सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली.















Discussion about this post