बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. युको बँकेत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. अप्रेंटिसशिप पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण ५०० पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
विशेष युको बँकेतील ही भरती सुरु झाली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. www.uco.bank.in या वेबसाइटवर जाऊन इच्छुकांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२५ आहे.
युको बँकेतील या भरतीमध्ये ५३२ पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जपप्रक्रिया २१ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
युको बँकेतील अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. त्यांच्याकडे मार्कशीट असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि लोकल लँग्वेज टेस्टद्वारे होणार आहे.
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला NATS पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागेल.
यानंतर रजिस्ट्रेशन आणि लॉग इन करावे लागेल.
यानंतर तुमची सर्व माहिती भरा. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीबाबत माहिती द्या.
यानंतर फोटो आणि सही अपलोड करा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी प्रिंट आउट काढून ठेवा.















Discussion about this post