केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. सीबीएसई बोर्डाने २०२५-२६ या शैक्षणिक सत्रासाठी प्रात्यक्षिक परीक्षेसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. सीबीएसईची दहावी आणि बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १७ फेब्रुवारी ते ४ एप्रिल २०२५ दरम्यान घेतल्या जाणार आहेत.
सीबीएसई बोर्डाने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, थंडी असलेल्या झोनमधील शाळा जानेवारीपूर्वी ६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण करू शकतात. थंडी नसलेल्या झोनसाठी या परीक्षा १ जानेवारी २०२६ पासून सुरू होतील. २९ ऑक्टोबरपर्यंत दिवाळी आणि छठ हे सण संपत आहेत. त्यानंतरच सीबीएसईच्या परीक्षा सुरू होतील. सीबीएसईने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, नोव्हेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यापासून प्रॅक्टीकल परीक्षा, प्रोजेक्ट, इंटरनल असेसमेंट्स सुरू होतील.
सीबीएसईने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, दहावी आणि बारावीच्या सिद्धांत परीक्षा १७ फेब्रुवारीपासून सुरू होतील. दहावीच्या बोर्ड परीक्षा ९ मार्च रोजी संपतील. तर बारावीच्या परीक्षा ९ एप्रिल रोजी संपतील. दहावीची परीक्षा १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १:३० या वेळेत घेतल्या जातील. तर बारावीच्या परीक्षा १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १:३० या वेळेत घेतल्या जातील. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांनी वेळापत्रक कसे तपासावे –
– सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्या.
– आता मुख्य वेबसाइट लिंकवर जा.
– होम पेजवर दिलेल्या विंटर-बाउंड स्कूल प्रॅक्टिकल डेटशीट लिंकवर क्लिक करा.
– तुमच्या स्क्रीनवर वेळापत्रक दिसेल.
– वेळापत्रक तपासा आणि प्रिंटआउट काढून घ्या.















Discussion about this post