नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी पास तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अप्रेंटिसशिप पदासाठी ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १६ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.
भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये एकूण ११० पदांची भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करायचे आहे. अंतिम मुदतीनंतर अर्ज स्विकारले जाणार नाही.अप्रेंटिसशिप पदासाठी १४ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी किंवा आयटीआयमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. विविध पदांसाठी पात्रता वेगवेगळी आहे. त्यामुळे आधी तुम्ही अधिसूचना वाचा त्यानंतर अर्ज करा.
रजिस्ट्रेशन कसं करावं?
अप्रेंटिसशिप पदासाठी अर्ज करताना सर्वात आधी अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर होमपेजवरील अप्लाय लिंकवर क्लिक करा.
यानंतर तुमची वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक पात्रतेबद्दल माहिती भरा.
यानंतर फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट आउट काढून ठेवा. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला दहावीचे प्रमाणपत्र अपलोड करायचे आहेत.
भारत सरकारच्या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. चांगल्या सरकारी कंपनीत तुम्हाला काम करायची संधी मिळणार आहे. याचसोबत तुम्हाला प्रशिक्षणदेखील दिले जाणार आहे. ज्याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. त्यामुळे तरुणांसाठी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.















Discussion about this post