अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून यात हिट अँड रनचे प्रकरणही वाढताना दिसत आहे. अशीच एक घटना समोर आलीय. ज्यात एका कॉलेजजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दोन बहिणींना चिरडले. या दुर्घटनेमध्ये थोरल्या बहिणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. धाकटी बहीण गंभीररित्या जखमी आहे.
ही अपघाताची घटना चंदीगडमध्ये घडली आहे. अपघातग्रस्त झालेल्या दोन्ही बहिणी या चंदीगड सेक्टर ४५ च्या बुडैल येथे त्यांच्या कुटुंबासह राहत होत्या. त्यांचे कुटुंब मूळचे उत्तरप्रदेशचे आहे. अपघातात मृत्यू झालेल्या थोरल्या बहिणीचे नाव सोजेफ (वय २२ वर्षे) आणि जखमी झालेल्या धाकट्या बहिणीचे नाव ईशा असे आहे. कॉलेज सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी दोघी रिक्षाची वाट पाहत होत्या. याच दरम्यान कारने दोन्ही बहिणींना धडक दिली.
या अपघातात सोजेफचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तर ईशाही जखमी झाली.अपघातानंतर मुलींना मदत करण्याऐवजी घटनास्थळावरुन पळून गेला. पोलिसांनी कार प्लेटच्या मदतीने मालकाची माहिती मिळवली. पण मालक त्यांना सापडला नाही. त्याने घर विकल्याचे वृत्त आहे. ज्या कारने त्याने दोन्ही मुलींना चिरडले, त्या कारवर डझनभराहून अधिक चलन प्रलंबित असल्याचे स्पष्ट झाले आहे.















Discussion about this post