जळगाव । दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असते. सध्या रेल्वे गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाल्यामुळे अनेक जण खासगी बसेसने गावी जातात. मात्र याचाच फायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्स मालकांनी तिकीट दरामध्ये दुपटी-तिप्पटीने वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांचे दिवाळीपूर्वीच दिवाळे निघत आहे.
जळगाव जिल्ह्यासह खान्देशातील अनेक जण पुण्यात नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने राहतात. दिवाळीसाठी हजारो नागरिक गावी जातात. यासाठी एसटी महामंडळाकडून अतिरिक्त बस सोडण्यात आल्या आहेत. एसटी बस, रेल्वेचे दिवाळी अगोदर दोन ते तीन दिवसांचे बुकिंग ‘फुल्ल’ झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सचाच पर्याय राहिला आहे.
याचाच फायदा घेऊन ट्रॅव्हल्स मालकांनी तिकीट दरामध्ये दुपटी-तिप्पटीने वाढ केली आहे. खासगी प्रवासी बसला एसटी महामंडळाच्या प्रवासी तिकीट दराच्या दीडपटीपेक्षा जादा भाडेदर आकारण्यास राज्य शासनाच्या २०१८च्या निर्णयानुसार बंदी आहे; पण ट्रॅव्हल्सला मागणी जास्त असल्यामुळे ट्रॅव्हल्स चालक या कालावधीत नियमित तिकीटदरापेक्षा दुप्पट ते तिप्पट वाढ करतात
मार्गाचे नाव —- सरासरी ऑनलाइन तिकीट दर
पुणे – जळगाव — २५००-३०००
मुंबई – जळगाव — २३००-२८००
नागपूर – जळगाव– १५००-२०००
सुरत – जळगाव — १५००-२०००
इंदोर-जळगाव — १००० ते १५००















Discussion about this post