राइट्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. राइट्स लिमिटेडमध्ये ६०० रिक्त पदांसाठी भरती होणार असून ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार १२ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करू शकतो. या नोकरीबाबतची सर्व माहिती तुम्हाला rites.com या वेबसाइटवर मिळेल.
पदाचे नाव : वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल, इलेक्ट्रिकल मॅकेनिकल किंवा इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा प्राप्त केलेला असावी.केमिस्ट्रीमध्ये बीएससी पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत विविध पदांसाठी पात्रतादेखील वेगवेगळी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हा पात्रता पाहा. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय ४० वर्ष असावे.
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये फी भरावी लागणार आहे.
राइट्समधील या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला २९,७३५ रुपये मासिक वेतन मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. तुम्हाला १२५ प्रश्न विचारले जातील. यामध्ये मिळणाऱ्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.















Discussion about this post