सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. विशेष या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
इच्छुकांनी लवकरात लवकर अधिसूचना वाचावी. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑक्टोबर २०२५ आहे. त्यामुळे तुम्ही अंतिम मुदतीपर्यंत अर्ज करु शकतात.यासाठी www.sail.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.
स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर आणि ज्युनिअर इंजिनियरिंग असोसिएट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी निवड झाल्यावर सुरुवातीला ५०,००० ते १,६०,००० रुपये पगार मिळणार आहे. एक वर्षांची सर्व्हिस पूर्ण झाल्यानंतर ६०,००० ते १,८०,००० रुपये पगार मिळणार आहे. ज्युनिअर असोसिएट पदासाठी २६६०० ते ३८९२० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
सेलमधील या नोकरीसाठी विविध पदांसाठी पात्रता वेगवेगळी असणार आहे. तुम्ही १०वी पास असणे गरजेचे आहे.ज्युनिअर इंजिनियरिंग असोसिएट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ३ वर्षांचा डिप्लोमा मॅकेनिकल /इलेक्ट्रिकल/केमिकल/पावर प्लांट/प्रोडक्शन/इंस्ट्रूमेंटेशन इंजीनियरिंग डिसिप्लीनमध्ये केलेला असावा.
असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी) पदासाठी उमेदवारांनी बी.ई किंवा बीटेक केलेले असावे. याचसोबत २ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ३० वर्षे असावी.















Discussion about this post