सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आता वाढवून देण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. तुम्हाला जर काही कारणांनी अर्ज करता आले नसतील तर ही चांगली संधी आहे. स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
पात्रता (Eligibility)
स्टेट बँकेतील या नोकरीसाठी २५ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ग्रॅज्युएशन किंवा मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत त्यांना बॅलेन्स शीट, अप्रेजल, क्रेडिट प्रपोजल, क्रेडिट मॉनिटरिंग याबाबत माहिती असायला हवी. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ८५,९२० ते
रुपये पगार मिळणार आहे.
कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी
या नोकरीसाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी sbi.bank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.















Discussion about this post