जळगाव । गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा कहर सुरु असून दसऱ्यापूर्वीच दोन्ही धातुनी महागाईचे सीम्मोलंघन केले. आज सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ झाली आहे. वाढलेल्या दरामुळे दसरा मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.
जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याने चांदीच्या दराने पुन्हा नवा उच्चांक केला आहे. आज सोन्याच्या दरामध्ये १५०० रुपयांची..तर चांदीच्या दरात सुद्धा १५०० रुपयांची वाढ झाली आहे. ज्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 20 हजार 500 रुपयांवर पोहचले आहेत तर चांदीच्या दराने 1 लाख 51 हजाराचा टप्पा गाठला आहे.
दोन दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये प्रत्येकी अडीच हजार रुपयांची वाढ झाली आहे. एकाच महिन्यात सोन्याच्या दराने तब्बल एक लाख वीस हजारांचा तर चांदीच्या दराने दीड लाखांचा आकडा पार केला आहे. जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्यासह चांदीने हा पल्ला गाठला आहे.















Discussion about this post